Coronavirus : धक्कादायक! ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 09:36 AM2020-04-05T09:36:55+5:302020-04-05T09:51:47+5:30

Coronavirus : कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Coronavirus women died due to icu was locked in bhopal SSS | Coronavirus : धक्कादायक! ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास

Coronavirus : धक्कादायक! ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास

googlenewsNext

भोपाळ - भारतातही कोरोना आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना  जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. जान है तो जहान है... असं म्हणत नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन मोदींनी जनतेला हात जोडून केले. नाही तर देशाला याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
 
भोपाळमध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रुग्णालयातील आयसीयुला कुलूप असल्याने जवळपास अर्धा तास महिला रुग्णवाहिकेतच होती. पुढचे उपचार मिळेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या  माहितीनुसार, लक्ष्मीबाई असं 55 वर्षीय मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.  त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यातच त्यांचा रक्तदाब वाढल्यानै कुटुंबियांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र कोरोनाच्या संशयामुळे लक्ष्मीबाई यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आलं.

उपचारासाठी दाखल होताच रुग्णालयातील आयसीयुला कुलूप असल्याने त्यांना रुग्णवाहिकेतच अर्धा तास थांबावे लागले. आयसीयूचं कुलूप काही वेळाने उघडण्यात आलं मात्र उपचार सुरु होईपर्यंत लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला. वेळेवर उपचार न मिळाल्याने लक्ष्मीबाई यांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3000 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 99 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला असून अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा आजारा वेगाने पसरत चालला आहे. आतापर्यंत जगात 11 लाख 67 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 62 हजार 691 जण मृत्युमुखी पडले आहेत. जगातील सुमारे 200 देशांमधील विविध रुग्णालयांमध्ये 8 लाख 50 हजारांहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू असून त्यातील 40 हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सचा तब्बल 250 किमीचा प्रवास

CoronaVirus कोरोनाचे बुमरँग चीनवरच उलटणार; जगासाठी भारत 'बाजीगर' ठरणार

CoronaVirus हाहाकार! जगभरात ११ लाखांहून अधिक रुग्ण; ६२ हजार बळी

CoronaVirus : अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ३ लाखांहून अधिक, दुबईत लॉकडाऊनचा निर्णय
 

Web Title: Coronavirus women died due to icu was locked in bhopal SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.