जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. आतापर्यत 29 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 2 लाख 6 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्या घरात गेला आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी आता जगाचं भारताकडे लक्ष लागलं आहे.
भारताला जगातील सर्वाधिक औषधांचं उत्पादन करणारा देश म्हणून ओळखले जाते. तसेच भारतात पोलिओ, मेनिंजायटीस, न्यूमोनिया, रोटाव्हायरस, बीसीजी, गोवर, गालगुंड आणि रुबेला लस किंवा औषधं पूरक बनवली जातात. त्यामुळे कोरोनावरही मात करण्यासाठी भारत लवकरचं लस तयार करेल असा विश्वास जगभरातून व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनावर मात करण्यासाठी लस शोधण्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन केले होते. नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी देशातील अनेक शास्त्रज्ञ पुढे सरसावले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी लवकरच लस तयार केली जाईल असा विश्वास भारतीय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदचे संचालक डॉ. शेखर मंडे म्हणाले की, आम्ही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)ची परवानगी घेऊन कोरोनासाठी कुष्ठरोगाच्या उपचारातील प्रभावी लसची चाचणी सुरू केली आहे. तसेच आम्ही जीनोम अनुक्रमांकडे लक्ष देत आहे. जीनोम अनुक्रमांद्वारे जर एखाद्यामध्ये विषाणू आला असेल तर तो कोणाद्वारे आणि कसा आला याची माहिती मिळेत असं शेखर मंडे यांनी सांगितले.
कोरोनावरील उपचारांसाठी कोणतीही लस दिली गेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही आपली लस तयार करण्यास किमान एक वर्ष लागणार असल्याचे म्हटले आहे. चीन, अमेरिका आणि भारत यासह 50 देशांमध्ये, शास्त्रज्ञ आज कोरोना लस तयार करण्यासाठी काम करत आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा”
महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या करवाढीच्या सल्ल्यामुळे मोदी सरकार संतप्त, दिले चौकशीचे आदेश
किम जोंग उन जिवंत; दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांचा मोठा खुलासा
Corona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला...