नवी दिल्ली : आज संपूर्ण जगभरात जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा सामना करणाऱ्या देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच, नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना सोशल डिस्टंसिंग (Social Distancing) पाळण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर लिहिले आहे की, "आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण फक्त आपल्या एकमेकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करुया नको, तर कोरोनाविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व करण्याऱ्या त्या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचेही आभार व्यक्त करूया." याचबरोबर, नरेंद्र मोदी म्हणाले, "जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण खात्रीपूर्वक सोशल डिस्टंसिंगचे पालन करूया. ज्यामुळे आपल्यासह दुसऱ्याच्या जीवाची सुरक्षा करता येईल. आशा आहे की हे दिवस आपल्याला वर्षभरासाठी व्यक्तीगत फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करतील, जे आपल्या आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होईल."
याशिवाय, नरेंद्र मोदींनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडियोला त्यांनी 'फिर मुस्कुराएगा इंडिया... फिर जीत जाएगा इंडिया' अशी टॅग लाईन दिली आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडमधील कलाकारांसह क्रिकेटपटू शिखर धवन दिसत आहेत. या व्हिडीओच्या गाण्यामधून लोकांना कोरोनाचा सामना करण्यासाठी एकजूट होण्याचे आणि घरातच राहण्यासाठी आवाहन केले आहे.
दरम्यान, दरवर्षी सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येत असतो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी ७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी, यावर एकमत झाले. त्यानंतर ७ एप्रिल १९५०पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.