Coronavirus: चिंताजनक! केरळमध्ये २४ तासांत ३० हजार नवे रुग्ण; ११५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 07:29 AM2021-09-01T07:29:56+5:302021-09-01T07:30:04+5:30

गेल्या २४ तासात १,६०,१५२ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे.

Coronavirus: Worrying! 30,000 new patients in Kerala in 24 hours; 115 killed pdc | Coronavirus: चिंताजनक! केरळमध्ये २४ तासांत ३० हजार नवे रुग्ण; ११५ जणांचा मृत्यू

Coronavirus: चिंताजनक! केरळमध्ये २४ तासांत ३० हजार नवे रुग्ण; ११५ जणांचा मृत्यू

Next

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये मंगळवारी कोरोनाचे नवे ३०,२०३ रुग्ण समोर आले तर, ११५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात कोरोना विषाणूने बळी घेतलेल्यांची संख्या २०,७८८ झाली आहे. चाचण्यात रुग्ण सकारात्मक निघण्याचे प्रमाण सोमवारी १६.७४ टक्क्यांवर उतरले. 

गेल्या २४ तासात १,६०,१५२ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. आतापर्यंत राज्यात ३,१५,५२,६८१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. सोमवारपासून २०,६८७ जण कोरोनातून बरे झाले तर, उपचाराधीन रुग्णांची संख्या २,१८,८९२ आहे. राज्यातील १३ जिल्ह्यातील रुग्णसंख्या अशी - मालाप्पुरम ३,५७६, एर्नाकुलम ३,५४८, कोल्लम ३,१८८, कोझिकोडे ३,०६६, थ्रिसूर २,८०६, पालाक्कड २,६७२, थिरुवनंतपुरम १,९८०, कोट्टायम १,९३८, कन्नूर १,९२७, अलाप्पुझा १,८३३, पथनामथिट्टा १,२५१, वायनाड १,०४४ आणि इडुक्की ९०६.

आकडे बोलतात

नव्या रुग्णांमध्ये ११६ हे आरोग्य कर्मचारी, १४७ हे राज्याबाहेरचे आणि २८,४१९ कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाले आहेत.  १,५२१ जणांना बाधा कशी झाली, हे स्पष्ट नाही. सध्या ३१,७०७ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Web Title: Coronavirus: Worrying! 30,000 new patients in Kerala in 24 hours; 115 killed pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.