पाटणा : भ्रष्टाचाराला अजिबात थारा देणार नाही आणि बिहारला विकासाच्या मार्गावर नेणार, असे आश्वासन बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यामुळे टीकेचा सामना करीत असलेले राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी सोमवारी दिले.रस्ते बांधकाम खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर तेजस्वी यादव पत्रकारांशी बोलत होते. भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी लोकांबद्दल अजिबात दयामाया दाखविली जाणार नाही. भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. (वृत्तसंस्था)
भ्रष्टाचाराला थारा नाही -तेजस्वी
By admin | Published: November 24, 2015 12:07 AM