जयशंकर गुप्त,नवी दिल्लीललित मोदी आणि व्यापमं घोटाळ्याप्रकरणी चहुबाजूंनी विरोधकांचे हल्ले झेलणाऱ्या मोदी सरकारच्या हाती काँग्रेसशासित उत्तराखंड राज्यातील भ्रष्टाचाराच्या स्टिंगमुळे आयते कोलित सापडले आहे. भाजपाने बुधवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या खासगी सचिवाविरोधातील एक स्टिंग जारी केले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या खासगी सचिवाला सोबत घेऊन अबकारी नियमांत बदल केला आणि काही खासगी कंपन्यांना दारू उत्पादन व विक्रीचे परवाने दिले, असा आरोप या स्टिंगच्या माध्यमातून भाजपाने केला आहे.या स्टिंगच्या निमित्ताने मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या राजीनाम्याची मागणी करीत भाजपाने काँग्रेसला नेमक्या वेळी खिंडीत गाठले आहे. खुद्द हरीश रावत यांनी मात्र आपल्या व सरकारविरोधातील सर्व आरोप नाकारले असून, संबंधित स्टिंग व्हिडिओच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मद्य उत्पादन आणि विक्रीचे परवाने लॉटरी प्रणालीद्वारे दिले जातात, असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, गुरुवारी भाजपा सदस्य संसदेच्या दोन्ही सभागृहात हे प्रकरण जोरकसपणे लावून धरतील.
उत्तराखंडमध्ये ‘भ्रष्टाचारा’चे स्टिंग
By admin | Published: July 23, 2015 12:07 AM