मुंबई: पेट्रोल, डिझेलसोबतच गेल्या काही महिन्यांत एलपीजी सिलिंडरचे दरदेखील गगनाला भिडले. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे अन्नधान्याचे दर वाढले असताना त्यात सिलिंडरच्या वाढत्या दरांनी आणखी भर घातली. मात्र उद्यापासून सिलिंडरच्या दरात कपात होणार आहे. इंडियल ऑईल कॉर्पोरेशननं याबद्दलची माहिती दिली आहे. उद्यापासून सिलिंडरच्या दरात १० रुपयांनी कपात होणार आहे. (Cost Of Domestic LPG Cylinder To Reduce From April 1)पेट्रोल-डिझेल होऊ शकते आणखी स्वस्त; ग्राहकांना फायदा होणारसिलिंडरचे नवे दर १ एप्रिलपासून लागू होणार असल्याचं इंडियल ऑईल कॉर्पोरेशननं सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर घसरले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरातही घसरण होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या आठवड्याभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात तीनवेळा कपात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याची स्थिती पाहता यात आणखी घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मोठी बातमी! एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात; उद्यापासून नवे दर लागू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 7:49 PM