शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

खोकल्याचे औषध ३०० मृत्यूंचे कारण, सात भारतीय कफ सिरप काळ्या यादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 6:42 AM

याप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बनावट औषधे कधीही सहन केली जाणार नसल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : आफ्रिकन देश गांबियासह जगभरातील ३०० लोकांच्या मृत्यूला जबाबदार धरून जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ)ने सात भारतीय कफ सिरप तयार करणाऱ्या कंपन्यांवर बंदी घातली आहे. यामुळे भारताच्या औषध निर्माण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.याप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बनावट औषधे कधीही सहन केली जाणार नसल्याचे म्हटले आहे. औषधांचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक जोखमीवर आधारित विश्लेषण केले जात आहे. भारत औषधांच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करणार नाही. बनावट औषधांमुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी आम्ही सदैव सतर्क असतो, असे ते म्हणाले. डब्ल्यूएचओने गांबियातील ६६ मुलांच्या मृत्यूसाठी भारतीय कफ सिरपला जबाबदार धरले आहे. कंपनी आणि नियामक अधिकारी या कंपन्यांची चौकशी करत आहेत.

९ देशांमध्ये अलर्टगेल्या काही महिन्यांत जगातील अनेक देशांमध्ये दूषित कफ सिरपमुळे ३०० मुलांचा मृत्यू झाला आहे. कफ सिरपव्यतिरिक्त डब्ल्यूएचओने व्हिटॅमिन बनवणाऱ्या कंपन्यांचीही तपासणी केली आहे. याविषारी कफ सिरपच्या विक्रीबाबत आतापर्यंत ९ देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

किडनी निकामी- डब्ल्यूएचओ भारत आणि इंडोनेशियामध्ये कफ सिरप आणि व्हिटॅमिन बनवणाऱ्या २० कंपन्यांची चौकशी करत आहे. - एका एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या कंपन्यांच्या औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. - चार कफ सिरपच्या विरोधात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या औषधांमुळे गांबियातील ६६ मुलांची किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाला.

कॅमेरूनमध्येही १२ मुलांचा मृत्यूभारतातील कफ सिरपमुळे कॅमेरूनमध्येही १२ मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे कफ सिरप  इंदूर येथील कंपनीकडून तयार केले जाते.

जगाची फार्मसी अडकली फेक ड्रग्जमध्ये- बनावट औषधे तयार करणाऱ्या ७१ कंपन्यांना नोटीस-  १८ कंपन्यांना उत्पादन थांबविण्याचे आदेश- १२५ पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये जोखीम आधारित विश्लेषण

१७.६ अब्ज अमेरिकन डॉलरचे कफ सिरफ भारताने २०२२-२३मध्ये निर्यात केले.५०%+ लसींचा पुरवठा जगाला भारतातून४०%जेनेरिक औषधांचा पुरवठा अमेरिकाचा १ जूनपासून खोकल्याच्या औषधांचे परीक्षण बंधनकारकभारत औषध उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असून, मूल्यानुसार १४ व्या क्रमांकावर आहे.

कफ सिरफने मृत्यू कुठे?     गांबिया     ६६     उझबेकिस्तान    १८     कॅमेरून    १२

टॅग्स :medicinesऔषधंHealthआरोग्य