नवी दिल्ली : भारतात विकल्या जाणाऱ्या ५० पेक्षा अधिक कंपन्यांचे कफ सीरप (खोकल्याचे औषध) गुणवत्ता चाचणीत नापास झाल्याचे सरकारी अहवालातून समोर आले.
गेल्या वर्षी उझबेकिस्तानात कफ सिरप प्राशनाने १९ मुलांचा मृत्यू झाला होता. हा सीरप दिल्लीजवळील नोएडातील एका कंपनीने बनविला होता, अशी माहिती समोर आली होती. भारतात उत्पादित कफ सिरपमुळे जगभरात एकूण १४१ मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त यापूर्वीच येऊन गेलेले आहे. आता सिरपच्या निकृष्ट गुणवत्तेचे असल्याचे समोर आले.
मुंबईतील १० कंपन्यांचे नमूने आढळले सदोषगुजरातमध्ये विश्लेषण केलेल्या ३८५ नमुन्यांतील २० उत्पादकांचे ५१ नमूने नापास झाले.मुंबईतील औषधी प्रयोगशाळेने ५२३ नमुन्यांचे विश्लेषण केले. त्यातील १० कंपन्यांचे १८ नमूने नापास झाले.