विज्ञान परिषदेला थाटात प्रारंभ शिवाजी महाविद्यालयात तीन दिवस चालणार परिषद
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM
अकोला : शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डॉ. होमी भाभा विज्ञान केंद्र मुंबई व टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसर्या विज्ञान परिषदेला शिवाजी महाविद्यालयात थाटात प्रारंभ झाला.
अकोला : शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डॉ. होमी भाभा विज्ञान केंद्र मुंबई व टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसर्या विज्ञान परिषदेला शिवाजी महाविद्यालयात थाटात प्रारंभ झाला. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात माजी कुलगुरू डॉ.व्ही.एस. जामोदे यांच्या हस्ते विज्ञान परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार होते. यावेळी मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव चर्जन, डॉ.एन.डी. देशमुख, डॉ. मुर्तजा अली, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, प्रा. राज सलाडे, उपप्राचार्य डॉ. एस.पी. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व वाढत आहे. अशा परिस्थितीत विज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून देश आणि समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. विज्ञान परिषद २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या परिषदेत विविध तज्ज्ञांकडून जिल्ातील विज्ञान शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विज्ञान प्रदर्शनाचेदेखील आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. वैज्ञानिक मॉडेलच्या माध्यमातून विज्ञान समजावून सांगण्याचा प्रयत्न व विद्यार्थ्यांचा कल विज्ञानाकडे वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विज्ञान प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी केले आहे. फोटो : २१ सीटीसीएल ३८, ४३, ४४