नवी दिल्ली : भारतात किमान २0 कोटी लोकांना अन्नावाचून एक तर उपाशी राहावे लागते अथवा अर्धपोटी भोजनावर दिवस काढावा लागतो. देशात दरडोई सरासरी ५00 ग्रॅम अन्नाची गरज आहे. पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे रोज ८२१ बालकांचा मृत्यू होतो.
हे विदारक चित्र एकीकडे आहे तर सरकारी बेपर्वाईमुळे गेल्या १0 वर्षांत गोदामांमधील ७.८0 लाख क्विंटल धान्य सडून वाया गेल्याचे उघड झाले आहे. याचाच अर्थ असा की रोज सरासरी ४३ हजार लोकांच्या वाट्याचे अन्न सडल्यामुळे वाया गेले. माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाद्वारे हे सत्य समोर आले आहे.
खाद्यान्न विशेषज्ञांच्या मते मुख्यत्वे पावसात भिजल्यामुळे दहा वर्षांत सरकारी अथवा गैरसरकारी गोदामांमधील धान्य सडून गेले. उपलब्ध आकडेवारीनुसार यूपीए सरकारच्या ६ वर्षांच्या कालखंडात ४.४२ लाख क्विंटल धान्य सडले, तर मोदी सरकारच्या चार वर्षांच्या काळात ३.३८ लाख क्विंटल धान्य सडल्याची माहिती आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान म्हणतात की, ४ वर्षांत धान्य खराब होण्याचे प्रमाण घटले, याचे कारण धान्य सडू नये, यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सरकारने केल्या आहेत. यंदा किती नासाडीभारतात साधारणत: २३७.४0 कोटी क्विंटल धान्योत्पादन प्रतिवर्षी होते. त्यातील सरासरी १२.६४ कोटी क्विंटल धान्य शेतातून गोदामात पोहोचेपर्यंत खराब होऊन जाते. यंदा सप्टेंबरपर्यंत ४६४0 क्विंटल धान्य खराब झाल्याची माहिती मिळाली आहे.पश्चिम बंगालमध्ये सडले सर्वाधिक अन्नधान्यराज्य सडलेले अन्नधान्यप. बंगाल १ लाख ५४ हजार ८१0 क्विंटलबिहार ८२ हजार १0 क्विंटलपंजाब ३२ हजार ८00 क्विंटलउत्तर प्रदेश २४ हजार ४९0 क्विंटलउत्तराखंड ३४ हजार ५८0 क्विंटलझारखंड ७ हजार ८९0 क्विंटलदिल्ली १३७0 क्विंटल