शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

देश-परदेश-सिंगापूर-निवडणूक

By admin | Published: September 02, 2015 11:31 PM

देश-परदेश-सिंगापूर-निवडणूक...२ सप्टेंबर २०१५

देश-परदेश-सिंगापूर-निवडणूक...२ सप्टेंबर २०१५

सिंगापूरच्या निवडणूक आखाड्यात
२१ उमदेवार मूळचे भारतीय
एकूण ८१ रिंगणात : सत्तारूढ पक्षाची कसोटी
सिंगापूर : पुढच्या आठवड्यात सिंगापूरमध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान ली लुंग यांच्या सत्तारूढ पक्षाच्या ५० वर्षांच्या राजकीय वर्चस्वाची कसोटी लागणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात १८१ उमेदवार असून, यात मूळ भारतीय असलेल्या २१ उमेदवारांचाही समावेश आहे.
११ सप्टेंबर रोजी होणार्‍या या निवडणुकीत नशीब अजमावणार्‍या मूळ भारतीय उमेदवारांत कायदा आणि विदेशमंत्री के. षण्मुगम, पंतप्रधान कार्यालयमंत्री एस. ईश्वरन आणि पर्यावरण व जलसंसाधनमंत्री व्हिव्हियन बालकृष्णन् यांचा समावेश आहे. हे सर्व दिग्गज सत्तारूढ पीपल्स ॲक्शन पार्टीचे उमेदवार आहेत.
याशिवाय उपपंतप्रधान व वित्तमंत्री थरमन षण्मुगारत्नम आणि अर्थतज्ज्ञ केनेथ जयारेत्नम हेही नशीब अजमावात आहेत. हे दोघेही मूळचे श्रीलंकेचे आहेत. अध्यक्ष टोनी टॅन केग याम यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार २५ ऑगस्ट रोजी बारावी संसद बरखास्त केल्याने मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग प्रशस्त झाला.
पीपल्स ॲक्शन पार्टीने ५० वर्षांपेक्षा अधिक काळ सत्ता गाजविली. ८९ सदस्यीय संसदेत सत्तारूढ पक्षाला पुन्हा बहुमत मिळविण्याची अपेक्षा असली तरी पक्ष संस्थापक आणि सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआय येव यांचे मार्चमध्ये निधन झाल्याने या पक्षावर दबाव येऊ शकतो. कारण विदेशींचे वाढते लोंढे आणि जीवनमान खर्चिक झाल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. १६ जीआरसी (ग्रुप रिप्रेझेंटेशन कॉन्स्टट्यिुयन्सी) आणि एक सदस्यीय मतदारसंघातून एकूण ८९ उमेदवार संसदेवर निवडून आणायचे आहेत. यासाठी सिंगापूरचे २.४६ दशलक्ष मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या सार्वत्रिक निवडणुकीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे सिंगापुरात स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असतानाच ही निवडणूक होत आहे.