नवी दिल्ली - भारतात राहताना आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते, असे वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी देशातील परिस्थितीबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. या देशात सध्या भयंकर तिरस्कार आणि क्रूरतेचे वातावरण आहे, अशी टीका केली आहे. अॅम्नेस्टी इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर नसिरुद्दीन शाह यांचे हे वक्तव्य ट्विट करण्यात आले आहे. त्यात नसिरुद्दीन शाह म्हणतात की, ''सध्या या देशामध्ये भयंकर तिरस्कार आणि क्रूरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरलेले वर्ष हे विचार स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांची गळचेपी करणारे ठरले. आता नव्या वर्षात आपल्या घटनात्मक अधिकारांसाठी उभे राहण्याची आणि ही अंधाधुंदी संपवा, असे सरकारला बजावण्याची वेळ आली आहे.''
देशात भयंकर तिरस्कार आणि क्रूरतेचे वातावरण, नसिरुद्दीन शाहांचे पुन्हा टीकास्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 10:03 PM
भारतात राहताना आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते, असे वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी देशातील परिस्थितीबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे.
ठळक मुद्देदेशात सध्या भयंकर तिरस्कार आणि क्रूरतेचे वातावरण सरलेले वर्ष हे विचार स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांची गळचेपी करणारे ठरलेनव्या वर्षात आपल्या घटनात्मक अधिकारांसाठी उभे राहण्याची आणि ही अंधाधुंदी संपवा, असे सरकारला बजावण्याची वेळ आली आहे