शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

देशाने कोरोनाच्या ७ लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 4:53 AM

जानेवारी महिन्यात कोविड-१९ ची पहिली चाचणी घेतली गेली होती. देशाने दररोज ५० हजार चाचण्या करण्याचाही नवा विक्रम केला.

नवी दिल्ली : भारताने मंगळवारी कोविड-१९ च्या सात लाखांपेक्षा जास्त चाचण्या करून नवा विक्रम स्थापन केला. देशात यावर्षी जानेवारी महिन्यात कोविड-१९ ची पहिली चाचणी घेतली गेली होती. देशाने दररोज ५० हजार चाचण्या करण्याचाही नवा विक्रम केला.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार २८ एप्रिलच्या सकाळी ९ वाजेपर्यंत ७,१६,७३३ चाचण्या केल्या गेल्या, तसेच गेल्या २४ तासांत मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ५०,९१४ चाचण्या झाल्या. देशात झालेल्या एकूण चाचण्यांनी मंगळवारी गाठलेली संख्या ही गेल्या फक्त २२ दिवसांत त्यात सातपट वाढीमुळे असून, जानेवारीपासूनचा विचार केला, तर त्यात १५० पट वाढ झालेली आहे. ६ एप्रिल रोजी एकूण चाचण्या ९६,२६४ होत्या.मंगळवारची संख्या ७,१६,७३३ असून, हा एक नवा विक्रमच आहे. झालेल्या चाचण्या या निदान होण्यासाठी रिव्हर्स ट्रान्सस्क्रिप्शन-पॉलिमेरेस चेन रिअ‍ॅक्शन (आरटी-पीसीआर) कीटचा उपयोग करून झालेल्या आहेत व ही चाचणी अतिशय अचूक मानली जाते. या चाचण्यांच्या संख्येत अँटीबॉडी टेस्ट कीटस्ने केलेल्या चाचण्यांचा समावेश नाही. कारण ही चाचणी सदोष आढळली व त्यामुळे फेटाळली गेलेली आहे.देशात रेड झोन जिल्ह्यांची संख्या २५ एप्रिल रोजी १७० होती ती १६६ वर आली आणि येत्या दोन दिवसांत ती १५० होण्याची शक्यता आहे. रेड झोन जिल्हे हे तामिळनाडूत सर्वात जास्त ३८ पैकी २२, त्यानंतर महाराष्ट्रात ३६ पैकी १४ आहेत. महाराष्ट्रात फक्त सात जिल्हे ग्रीन झोन आहेत. आंध्र प्रदेशमध्ये १४ पैकी १२ जिल्हे हे रेड झोन, तर दिल्लीतील ११ पैकी १० जिल्हे रेड झोन आहेत. ११ वा जिल्हा आॅरेंज झोन आहे. देशात ७२० जिल्हे असून, त्यातील १६६ रेड, २६६ आॅरेंज आणि ३४८ ग्रीन झोनमध्ये आहेत. गोव्याच्या दोन जिल्ह्यांपैकी एक आॅरेंज, तर दुसरा ग्रीन आहे. गुजरातमध्ये ३३ जिल्ह्यांपैकी ६ रेड, १४ आॅरेंज, तर ग्रीनमध्ये १३ आहेत. केंद्र आणि राज्य सरकारे रेड आणि आॅरेंज झोनमध्ये व्यत्यय न येऊ देता ग्रीन झोनमध्ये लॉकडाऊन कसा शिथिल करता येईल यासाठी एक समान धोरण आखत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या