-सुधीर बदामी
यंदाच्या अर्थसंकल्पाकडे पाहिल्यास सत्तेत आलेले नवीन सरकार प्रत्येक राज्याला काही तरी भरभरून देऊ शकेल, अशी आशा आहे. सुरक्षा, स्वच्छता, तिकीट सेवांमधील सुधार आणि नवीन गाडय़ांची घोषणा याकडे लक्ष लागलेले असतानाच सध्या देशाला मुख्य गरज आहे ती वेगवान गाडय़ांची. सध्या भारतात दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस सर्वाधिक वेगवान असून, ताशी 150 किलोमीटर वेगाने धावणा:या या ट्रेनला दिल्ली-आग्रा अंतर कापण्यास दोन तास लागत होते. आता सेमी हायस्पीड रेल्वे हेच अंतर 90 मिनिटांत पार करणार आहे. दिल्ली ते आग्रा असे 2क्क् किलोमीटरचे अंतर 90 मिनिटातच पार करताना ती 16क् किलीमीटरच्या वेगाने धावत होती. ही रेल्वे गाडी येत्या चार ते सहा महिन्यांत आणखी वेगवान होईल, अशी शक्यता आहे.
या ट्रेन भारतातील रेल्वेरुळावर चांगल्याप्रकारे धावू शकतात. मात्र तसे तंत्रज्ञान अमलात आणणो गरजेचे आहे. पण या नवीन हायस्पीड ट्रेनकडे आपण पाहिल्यास भारतातच अशी ट्रेन धावते असे नाही. जपान, चीन, फ्रान्स व इतर विकसित देशांमध्ये यापेक्षाही वेगाने धावणा:या ट्रेन असून, त्यांचा वेग ताशी 25क् ते 35क् कि.मी. आहे. म्हणजेच 2क्क् किलोमीटरने मुंबई-पुणो एका तासात जाऊ शकणारी संभावना दिसून येते. ताशी 150 किलोमीटरच्या अतिवेगाने धावणारी दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस दोन तासांत
धावते. मुंबई-दिल्ली राजधानी 1,385 किलोमीटरचे अंतर सुरुवातीला 19 तासांत कापत होती. आता या ट्रेनने लिंके-हॉफमन-बुश कोचेस वापरायला सुरू केल्यानंतर 16 तासांत अंतर कापले जाते. ही गाडी ताशी 14क् किलोमीटरच्या वेगाने धावते.
परदेशातील देशांमध्ये पाहिल्यास जपान सर्वात वेगवान
ट्रेनमध्ये पुढे आहे. जपानची शिंकान्सेन बुलेट ट्रेन तर ताशी 32क् किलोमीटरच्या वेगाने धावते. शिंकान्सेन सहा मार्गावर जाऊन जपानच्या वेगवेगळ्या औद्योगिक शहरांना जोडते. तशी बघितली तर ही मुंबईतील जलद लोकलसारखीच याची जोडणी आहे. मुंबई लोकलची जोडणी पाहिल्यास लोकल तसेच या मार्गावरून धावणा:या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचा वेग वाढणो खूप कठीण आहे. जपान हा लहान देश असल्याने औद्योगिक शहरे फारशी लांब नाहीत. (लेखक वाहतूक तज्ञ आहेत.)