फरिदाबादः देशाला विकासासाठी पंचसूत्रीची गरज असून, ती उपलब्ध झाल्यास अर्थव्यवस्था सुधारेल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. मानव रचना शैक्षणिक संस्था येथे इंडिया वेबलॉगचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले की, केंद्र सरकारचे लक्ष्य भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविणे आहे. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.कामगार, जमीन, कायदा, रसद आणि तरलता या पाच मुख्य मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे. ही पंचसूत्री देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल. चीनची लॉजिस्टिक किंमत 8 टक्के, भारताची 13 टक्के आणि अमेरिकेची 12 टक्के आहे, ती कशी कमी करावी याचा विचार केला पाहिजे. 1947पूर्वी आणि नंतर देशाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. देशातील नागरिकांनी नेहमीच सकारात्मक ऊर्जेनं अशा आव्हानांचा सामना केला. सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला हातभार लागणार आहे.
हेही वाचा
मोदींच्या शुभेच्छांवर ट्रम्प म्हणाले; "थँक्यू माझ्या मित्रा, अमेरिका भारतावर प्रेम करतो"
मुसळधार पावसानं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; संततधार कायम