नवी दिल्ली - देशाला समाजवादाची नव्हे तर रामराज्याची आवश्यकता असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी बुधवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते.
देशाला रामराज्याची गरज आहे. समाजवाद अव्यवहारीक आणि अप्रासंगिक झाला आहे. राम भक्तांवर गोळीबार करणाऱ्यांना मला प्रश्न विचारण्याचा हक्क नाही. अशा लोकांना रामराज्याचा अर्थही समजणार नाही. राम आमच्यासाठी आदर्श आहेत. आराध्य आणि मर्यादा पुरुषोत्तम असल्याचे योगी यांनी म्हटले. आयोध्येतील रामजन्मभूमी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय़ दिला आहे.
मुख्यमंत्री सदनात आयपॅड घेऊऩ आलेल्या योगींनी आयपॅडच्या मदतीने भाषण दिले. आयोध्यात दबलेल्या भावनांना एक व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे जगात भारताच्या लोकशाहीचे गुणगाण सुरू झाले. आयोध्येचा निकाल आल्यानंतर गोळी चालवणारे चुकीचे होते हे सिद्ध झालं, असंही योगींनी म्हटले.
योगी आदित्यनाथ यांनी याप्रसंगी राज्यातील समाजवादी पार्टी आणि बसपावर जोरदार टीका केली. ज्या लोकांनी महिलांवर अत्याचार केले, असे लोक महिला सशक्तीकरणावर बोलत आहेत. मात्र आता कोणी निरपराध लोकांना त्रास दिला तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येईल, असं आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.