लखनौ : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी रायबरेली येथे कीर्ती चक्र पुरस्कारप्राप्त शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. देशात दोन प्रकारचे सैन्य असू नये, अग्निवीर योजना बंद करण्यात यावी, असेशहीद कॅप्टनची आई मंजू सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.
आमचा मुलगा आम्हा सर्वांना असा मध्येच सोडून गेला, याचे आम्हाला प्रचंड दुःख आहे. कुटुंबाला त्यांची गरज होती. मला आयुष्यभर या वेदनासह जगायचे आहे आणि मला माझ्या मुलाची आठवण यावी म्हणून मला आणखी वेदना हव्यात, असे शहीद कॅप्टनची आई मंजू सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.
एकदिवसीय दौऱ्यात राहुल गांधींनी विविध संघटनांच्या कार्यकत्र्यांची भेट घेतली. राहुल यांनी रायबरेलीतील 'एम्स'ला भेट देत रुग्णांची भेट घेतली. दरम्यान, गांधींनी रायबरेलीतील एका हनुमान मंदिरात प्रार्थनाही केली.
शहिदांच्या कुटुंबांसाठी राहुल काहीतरी करतील
शहीद अंशुमन यांच्या आईने सांगितले की, राहुल गांधी यांच्या भेटीदरम्यान 'अग्निवीर'बाबत चर्चा झाली. दोन प्रकारचे सैन्य असू नये. सरकारने राहुल गांधींचे म्हणणे ऐकून त्यावर विचार करणे अपेक्षित आहे.
राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी सरकारला अग्निवीर योजना संपवण्याची विनंती केली आहे, ही योजना लष्करासाठी योग्य नाही. देशआमच्यासोबत आहे. मी राहुल गांधींशी इतर शहिदांच्या कुटुंबांबाबत बोलले आहे. कुटुंबांसाठी राहुल गांधी काहीतरी करतील, असे त्या म्हणाल्या
आम्ही सर्वांशी लढू सैन्य भरतीत अग्निवीर योजना बंद करण्यावर भर देताना मंजू सिंह म्हणाल्या की, आम्ही लष्करी कुटुंबातील आहोत, पक्ष असो किवा विरोधक, आम्ही सर्वांशी लढू आणि हात जोडून आम्ही सरकारला अग्निवीर योजना बंद करण्याची विनंती करतो. केवळ चार वर्षांसाठी सैन्यात भरती होणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.