शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

देश हळूहळू तिसऱ्या लाटेच्या पकडीत; १२ राज्यांमध्ये कोरोनात झपाट्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 2:25 PM

१२ राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर, नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सलग चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ३० हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ हे तिसऱ्या लाटेचे लक्षण असल्याचे तज्ज्ञ सांगतात. गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची ३०,७७३ नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर ३०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, ३८,९४५  संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

१२ राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत. सुमारे डझन राज्यांमध्ये, कोरोनाची दैनंदिन प्रकरणे एक हजाराच्या वर येत आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. तज्ज्ञांनी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तिसरी लाट येण्याचा अंदाजही व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत देश हळूहळू तिसऱ्या लाटेच्या पकडीत येत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मिझोरामसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा वेग वाढत आहे. केरळ अजूनही कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. राज्यात दररोज २० हजारांहून अधिक नवीन संक्रमित रुग्ण बाहेर येत आहेत.

  गेल्या २४ तासांमध्ये एकूण नवीन प्रकरणे आली - गेल्या २४ तासांमध्ये ३०,७७३ हजार बरे झाले - ३८,९४५ हजार एकूण मृत्यू - ३०९ झाले. गेल्या २४ तासांमध्ये - ८४.४२ लाख लसी देण्यात आल्या.   आतापर्यंत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३.३२ लाख असून एकूण संक्रमित लोकांची संख्या ३.३४ कोटी आहे. एकूण ३.२६ लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. मृत्यू आतापर्यंत ४,४४ लाख झाले असून एकूण कोरोना लस - ८०.४३ कोटी  देण्यात आल्या. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मते १८ सप्टेंबरपर्यंत एकूण ५५,२३,४०,१६८ नमुने चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शनिवारी (१८ सप्टेंबर) १५ लाख ५९ हजारांहून अधिक लोकांचे नमुने घेण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत