पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर झालेल्या तिरंग्याच्या अपमानावरही भाष्य केले. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन, कोरोना लस आदीवरही कटाक्ष टाकला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यामध्ये आणखी एक कार्य संपन्न झाले. ते म्हणजे पद्म पुरस्कारांचे वितरण. यामध्ये ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम केले त्यांचा समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानातूनही या महिन्यात खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या टीमने सुरुवातीला अनेक अडचणी झेलल्या त्यातून सावरले. मात्र, ऑस्ट्रेलियाला नमवून आले. आपल्य़ा खेळाडूंचे hard work आणि teamwork प्रेरित करणारे आहे, असे मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सवहे वर्ष भारतासाठी खूप महत्वाचे आहे. कारण यंदा स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव म्हणजेच 75 वे वर्ष सुरु होत आहे. आपल्या महानायकांशी संबंधित ठिकाणांची माहिती घेण्यासाठी योग्य वेळ आहे. मुंगेरच्या जयराम विप्लव यांनी तारापुर शहीद दिवसावर लिहिले आहे, त्यांचा धन्यवाद, असे मोदी म्हणाले.