नवी दिल्ली : हा भारत देश महात्मा गांधींच्या विचारांना मानणारा आहे. काही लोक देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बनवण्याचा प्रयत्न करीत असले तरी तसे अजिबात होणार नाही. कारण गांधीजींचे विचार हाच या देशाचा भक्कम पाया आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी केले.गांधी जयंतीनिमित्त राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीका केली. केवळ आपल्यालाच सारे काही कळते, असे समजणाऱ्यांना महात्मा गांधी काय समजणार, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. भारताची गेल्या पाच वर्षांतील स्थिती पाहून गांधीजींनाही दु:ख झाले असते, असेही त्या म्हणाल्या.महात्मा गांधींचे नाव आज अनेक जण घेत आहेत; पण त्यांच्या मार्गाने चालणे अवघड आहे, असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या की, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राहुल गांधी, नरसिंह राव व डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले; पण आज देशातील तरुण बेरोजगार आहेत, महिला असुरक्षित आहेत. काही जण आता साम- दाम- दंड- भेदाचा वापर करून स्वत:ला शक्तिशाली समजू लागले आहेत.
महात्मा गांधींनी दाखवलेला मार्ग सोडून अन्य रस्त्याने जाणारे याआधीही अनेक झाले; पण तरीही आपला देश भरकटला नाही. गांधीजींचे विचार आजही जिवंत असल्याचे ते उदाहरण आहे. त्यामुळे अनेक येतील आणि जातील. ते वाटेल त्या मार्गाने जातील; पण हा देश गांधीजींनाच कायम मानत राहील, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.सत्य आणि सत्ताअसत्यावर आधारित राजकारण करणाऱ्यांना गांधीजींचे सत्याचे राजकारण कधीही समजणार नाही. सत्तेसाठी आता काहीही करू पाहणाºयांना गांधीजींचा अहिंसेचा विचार समजणार नाही. सत्ता मिळताच आपण सर्वेसर्वा आहोत, असे समजू लागणाºयांना गांधीजींचा नि:स्वार्थ कळणार नाही, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर टीका केली.