नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचणीत पाच खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. कोरोनामुळे सभागृहांचे कामकाज रोज चारच तास चालणार आहे. 'पावसाळी अधिवेशन हे अत्यंत कठीण परिस्थितीत सुरू होणार आहे. संपूर्ण देशात भीतीचं वातावरण आहे. खासदारांमध्येही अशीच परिस्थिती आहे. जगातील परिस्थिती वेगाने बदलत आहे. यावर संसदेत चर्चा होणं आवश्यक आहे असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.
"भारत आणि चिनी सैन्य लडाखमध्ये आमने-सामने असून तणावाचं वातावरण आहे. जीडीपी घसरला आहे. महागाई आणि नवीन शिक्षण धोरण यासारख्या अनेक बाबींवर चर्चा होणं आवश्यक आहे. देशातील जनतेला या बाबींबद्दल जाणून घ्यायचं आहे. यामुळे संसदेत या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे" असं देखील आझाद यांनी म्हटलं आहे. गुलाम नबी आझाद यांनी प्रसारमाध्यमाना प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे.
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची जबाबदारी वाढली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपचारांसाठी शनिवारी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी हेही गेले असल्याने दोन्ही नेते काही दिवस लोकसभेत नसतील. त्यामुळे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची जबाबदारी वाढली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात येत असून त्यातील काही मंत्र्यांच्या चाचण्या अद्याप बाकी आहेत. अधिवेशन सुरू होण्याच्या 3 दिवस आधी खासदारांना कोरोना चाचणी करून घ्यावी, असे त्यांना सांगण्यात आले.
प्रश्नोत्तराच्या तासाचा कालावधी अर्ध्या तासावर
अधिवेशनाआधीची सर्वपक्षीय बैठक कोरोना साथीमुळे यंदा रद्द करण्यात आली. बैठकीची संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तयारी केली होती. कोरोना साथीमुळे प्रश्नोत्तराच्या तासाचा कालावधी अर्ध्या तासावर आणण्यात आला आहे. प्रश्नांची उत्तरेही लेखी स्वरूपात दिली जातील. फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याने राज्यसभा चेंबर, गॅलरी, लोकसभा चेंबर येथे खासदारांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. सभागृहाचे कामकाज व सदस्याचे भाषण नीट ऐकता यावे यासाठी दोन्ही सभागृहांच्या गॅलरीमध्ये स्क्रीन लावण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
"ही तर राज्यपुरस्कृत दहशत, आरोपींची 10 मिनिटांत सुटका", फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल
गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 17 धोकादायक अॅप्स, फोनमधून करा डिलीट नाहीतर...
CoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत
...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण
CoronaVirus News : लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा