नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आज आरबीआयने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि व्याजदरामध्ये कपात केली आहे. मात्र, याचबरोबर त्यांनी देशाच्या जीडीपीवरही मोठी भीती व्यक्त केली आहे. २०२०-२१ मध्ये देशाचा जीडीपी थेट शून्याखाली जाण्याचा अंदाज वर्तविला आहे.
डाळींच्या वाढणाऱ्या किंमती चिंतेचे कारण बनणार असून यंदा मान्सून चांगला होण्याच्या अंदाज असल्याने कृषी क्षेत्राकडून मोठी आशा असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. तसेच जागतिक व्यापार १३ ते ३२ टक्के घटण्याची शक्यता WTO ने वर्तविल्याचे ते म्हणाले.
भारतात मागमी घटली आहे. वीज, पेट्रोलिअम उत्पादनांमध्ये मोठी घट झाली आहे. तसेच अन्य वस्तूंची विक्रीही मंदावली आहे. कोरोनामुळे वैयक्तीक वापराच्या वस्तूंना मागणी नाहीय. गुंतवणुकीची मागणीही थांबलेली आहे. यामुळे महसुलातही मोठी घट झाल्याचे ते म्हणाले.
अन्य महत्वाच्या बातम्या....
CoronaVirus कोरोनाची मजल पुढच्या सूर्य ग्रहणापर्यंतच; काशीच्या ज्योतिषाचार्यांचे मोठे संकेत
कर्जदारांना मोठा दिलासा; EMI वर आरबीआयचा निर्णय
खूशखबर! महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८३ दिवसांनी दिल्ली सोडली; ओडिशा, पश्चिम बंगालचा पाहणी दौरा
चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र