राम मंदिरामुळे रामभक्तांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, कडाक्याच्या थंडीत नवविवाहित कपल पायीच अयोध्येला जायला निघालं आहे. हे दोघेही तब्बल 900 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. बिहारमधील कटिहार येथून पायी येत आहे. दोघे नुकतेच उत्तर प्रदेशातील बलिया येथे पोहोचले आहेत. रस्त्यात अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे.
कटिहारहून अयोध्येला जाणार्या रोशन कुमारने दिलेल्या माहितीनुसार, प्रेमविवाह नीट संपन्न झाल्यास रामाच्या दर्शनासाठी पायी जाईन असं म्हटलं होतं. नुकतीच त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत आता तो पत्नी रोशनीसह अयोध्येला रवाना झाला आहे. दोघे मिळून 900 किलोमीटरचा प्रवास करतील.
"भगवान रामाकडे माझी एकच इच्छा आहे की, आमचं कुटुंब सुखी ठेव. देशवासीयांनाही खूश ठेव. थंडीमुळे त्रास होत असला तरी मनोकामना पूर्ण झाल्याच्या आनंदात राम मंदिरात नक्की जाणार आहे. रस्त्यात लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. 22 जानेवारीनंतर जेव्हाही संधी मिळेल तेव्हा दर्शन घेऊ" असं रोशनने सांगितलं.
रोशन आणि त्याच्या पत्नीच्या पाठीवर बॅग आहे. बॅगेत प्रभू श्रीरामाचा ध्वज आहे. 'कटिहार ते अयोध्या' असा बॅनरही आहे. ते 22 जानेवारीपर्यंत अयोध्येला पोहोचतील अशी आशा आहे. यानंतर त्यांना जेव्हाही संधी मिळेल तेव्हा ते दर्शन घेणार आहेत. रोशनी कुमारी म्हणते की, आमचं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजमध्ये बदलल्याबद्दल देवाचे आभार. घरच्यांनी अगदी सहज होकार दिला. त्यामुळे आमच्या इच्छेनुसार आम्ही दोघं पायीच अयोध्येला जात आहोत. 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 23 जानेवारीपासून राम मंदिर सर्वसामान्यांसाठी दर्शनासाठी खुले होणार आहे.