नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य करता येतं. शिक्षणासाठी अनेक जण सर्व अडचणींवर मात करतात. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. शिक्षणासाठी गर्भवतीने स्कूटरवरून तब्बल 1200 किलोमीटरचा खडतर प्रवास केला आहे. आपल्या गर्भवती पत्नीला परीक्षा देता यावी यासाठी पतीने तिच्यासह 1200 किमीचा प्रवास केल्याची घटना झारखंडमध्ये घडली आहे. धनंजयकुमार आणि सोनी हेंबराम असं या पती-पत्नीचं नाव आहे. लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने त्यांनी हा प्रवास केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनी हेंबराम यांना डीएडची परीक्षा द्यायची होती. मात्र परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान काही सोय नव्हती. खासगी वाहनाने जाणे शक्य होते. मात्र त्यासाठी येणारा खर्च खूप जास्त होता. त्यामुळे त्यांच्या पतीने स्कूटरवरून त्यांना नेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना 1200 किमीचा प्रवास केला. हा प्रवास सोपा नव्हता. प्रवासात अनेक ठिकाणी त्यांना जोरदार पाऊस आणि खड्ड्यांचा देखील त्यांना सामना करावा लागला आणि ते ग्वाल्हेरमध्ये पोहोचले.
सोशल मीडियावर ही घटना जोरदार व्हायरल झाली असून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी गंभीर दखल घेत दाम्पत्याला मदत केली आहे. तर अदानी फाऊंडेशनने देखील त्यांना मदतीचा हात दिला आहे. तब्बल 1200 किमी प्रवास करणाऱ्या दाम्पत्याच्या परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी त्यांना विमानाचे तिकीट पाठवले आहे. तसेच त्यांच्या हवाई प्रवासाची उत्तम सोय करण्यात आली आहे.
दाम्पत्याचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अदानी फाऊंडेशनने पाठवलं विमानाचं तिकीट
परिक्षेसाठी प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला मात्र त्यावर मात करत आम्ही दाखल झालो. जिद्द न सोडल्याने हे शक्य झाल्याचं दाम्पत्याने म्हटलं आहे. तसेच अदानी फाऊंडेशनने मदत केल्ययाबद्दल धन्यवाद. आम्ही आतापर्यंत कधीच विमानाने प्रवास केला नाही. आयुष्यात पहिल्यांदा विमान प्रवास करणार आहोत. विमानाची तिकिटं पाठवल्याबद्दल आणि मदत केल्याबद्दल आभारी असल्याचं देखील दाम्पत्याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! "2021 मध्येही असणार कोरोनाचं संकट, देशातील काही भागात दुसरी लाट"
माणुसकीला काळीमा! कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेत बलात्कार
धक्कादायक! खेळता खेळता एक वर्षाच्या चिमुकल्याने गिळलं सापाचं पिल्लू अन्...
बापरे! रेल्वे स्थानकाजवळ भीषण स्फोट, 35 फूट उंच उडाले दगड; थरकाप उडवणारा Video