शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

मुंबईला जात असलेलं प्रेमी युगुल रेल्वेच्या टॉयलेटमध्ये सापडलं; पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 8:01 PM

बिहारच्या दानापूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

दानापूर : बिहारच्या दानापूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे रेल्वेच्या टॉयलेटमध्ये एक प्रेमी युगुल सापडल्याने एकच खळबळ माजली. आसाममधून पळून आलेल्या या प्रेमी युगुलाला बिहारच्या आरा रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात जीआरपी पोलिसांना यश आले आहे. रेल्वे पोलिसांनी दोन्ही प्रेमी युगुलांना आसाम पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

खरं तर हे दोघेही 14 मार्च रोजी घरातून पळून गेले आणि आसामच्या दिब्रुगड स्टेशनवर पोहोचले. तिथून ते दिब्रुगड-लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने मुंबईला रवाना झाले. मुलीच्या वडिलांनी आसाममधील लुमडिंग पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाशी संबंधित एफआयआर दाखल केला. यानंतर आसाम पोलिसांनी कारवाई सुरू केली. 

शाळेत जात असताना विद्यार्थिनीचे चालकावर जडलं प्रेमरेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दास असे या प्रियकर तरुणाचे नाव असून, तो आसाममधील होजई जिल्ह्यातील लुमडिंग पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. तो पेशाने एक ड्रायव्हर आहे. संबंधित तरुण आणि तरुणीचे घर जवळच आहे. मुलगी इयत्ता नववीची विद्यार्थिनी असून तरुण तरुणीपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे. शाळेत जात असताना तरुणाची नजर त्या मुलीवर पडली. यानंतर तो अनेक दिवस मुलीच्या मागे लागला.

अनेक महिने सुरू होते प्रेमप्रकरण सर्वप्रथम तरुणाने मैत्री करण्यासाठी आपला मोबाईल नंबर तरुणीला दिला आणि त्यानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले. मोबाईलवर बोलत असताना संजयने प्रेम व्यक्त केले. यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. मुलगी घरून शाळेत जायची तेव्हा वाटेत तरुण तिला भेटायचा. हे असे सुरू असतानाच त्या दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

मुलीच्या कुटुंबीयांकडून गुन्हा दाखल ठरल्याप्रमाणे दोघेही 14 मार्चला आसामच्या दिब्रुगड स्टेशनवर पोहोचले. मुलगी फिरायला जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या मैत्रिणींकडे देखील चौकशी केली. तपासादरम्यान संजयने त्यांच्या मुलीचे अपहरण केल्याचे कुटुंबीयांना समजले. मुलीच्या नातेवाईकांनी लुमडिंग पोलीस ठाण्यात संजय दासविरुद्ध अपहरणाचा एफआयआर दाखल केला.

प्रेमी युगुलाची आसामहून मुंबईकडे धावएकिकडे मुलीच्या घरचे तिला सर्वदूर शोधत होते तर हे दोघे ट्रेनमध्ये बसून मुंबईला निघाले होते. प्रेमी युगुलाच्या शोधासाठी तीन सदस्यांची टीम तयार करण्यात आली होती. पाटणा, दानापूर, आरामार्गे मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये दोघे असल्याची माहिती मिळाली. यानंतर लुमडिंग पोलीस स्टेशनच्या एसएचओने बिहार पोलिसांना याबाबात माहिती दिली. 

पोलिसांना पाहून ट्रेनच्या टॉयलेटमध्ये लपलेट्रेन आरा येथे पोहोचल्यावर जीआरपीने डब्बे तपासण्यास सुरुवात केली. पोलिसांना पाहताच प्रेमी युगुल टॉयलेटमध्ये लपले. मात्र, शौचालयात लपलेल्या दोघांना जीआरपीने पकडले. लुमडिंग पोलिसांनी सांगितले की, तरुण मंगळवारी तरुणीला घेऊन पळून गेला होता. मुलीच्या नातेवाईकांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर तातडीने कारवाई करत दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच यापूर्वीही हा तरुण एका मुलीसह पळून गेला होता, असे पोलिसांनी अधिक सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :BiharबिहारAssamआसामLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टMumbaiमुंबईPoliceपोलिस