न्यायालय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2016 10:55 PM
सिमी प्रकरणात गृह सहसचिवांची साक्ष
सिमी प्रकरणात गृह सहसचिवांची साक्षजळगाव : सिमी प्रकरणात तत्कालीन गृह विभागाचे सह सचिव आर. एन. देशमुख यांची ८ रोजी न्यायालयात साक्ष झाली.सिमी प्रकरणात आसिफखान बशीरखान अब्दुल व अन्य आरोपी यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी एमआयडीसी पोलिसांकडून प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यातील कागदपत्र, सिमी खटल्याचा यापूर्वी लागलेल्या निकालाची प्रत, आरोपी, साक्षीदार यांचे १६४ नुसारचे जबाब तसेच या संबंधात दाखल इतर कागदपत्रांचे आवलोकन करून हा प्रस्ताव आरोपीं विरुद्ध केस दाखल करण्यासाठी सही शिक्क्याने पाठविला होता. तो हाच आहे अशी साक्ष तत्कालीन गृह विभागाचे सह सचिव देशमुख यांनी न्या. ए. के. पटनी यांच्या न्यायालयात दिली. यावेळी सरकारतर्फे सरतपासनी व आरोपीतर्फे उलट तपासणी घेण्यातआली. यावर पुढील कामकाज २९ रोजी होणार आहे. या खटल्यात सरकारतर्फे सरकारी वकील टी. पी. पाटील तर आरोपीतर्फे ॲड. एस. डी. चौधरी व ॲड.शेख रऊफ यांनी काम पाहिले.