ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 06 - सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांचा बिनशर्त माफी अर्ज सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी स्वीकारला.
न्यायाधीश रंजन गोगाई आणि यू यू ललीत यांच्या खंडपीठाने माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांचा माफी अर्ज स्वीकारला. तसेच, त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी होणारी कारवाई थांबविली. मार्कंडेय काटजू यांनी त्यांच्या ब्लॉगमधील अवमानकारक मजकूर हटविला असून त्यांनी आपण कोर्टाचा आदर करतो, असे सांगितले आहे. जेष्ठ वकील राजीव धवल यांनी मार्कंडेय काटजू यांची कोर्टात बाजू मांडली.
केरळमधील सौम्या खूनप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल चुकीचा असल्याचे मार्कंडेय काटजू यांनी त्यांच्या ब्लॉगमधून म्हटले होते. त्यामुळे कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना कारवाईची नोटीस पाठविण्यात आली होती.