नवी दिल्ली- देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घालून देशाबाहेर परागंदा झालेल्या विजय माल्याला न्यायालयानं जोरदार धक्का दिला आहे. मनी लाँडरिंग कायदा प्रतिबंध (पीएमएलए)न्यायालयानं विजय माल्याचे 1 हजार कोटींचे शेअर्स विकण्यास मंजुरी दिली आहे. युनायटेड ब्रेवरेज (यूबीएल)मध्ये माल्याचे शेअर्स आहेत. जे न्यायालयानं विकण्यास परवानगी दिली आहे. या शेअर्सची विक्री रोखण्यासाठी विजय माल्यानं याचिका दाखल केली होती. युनायडेट ब्रेवरेजचे शेअर्स बीएसईमध्ये 1 टक्क्याच्या वाढीनं 1370 रुपयांवर पोहोचले आहेत. या महिन्यात कर्जवसुली प्राधिकरणानं न्यायालयाद्वारे नियुक्त केलेल्या लिक्विडेटरकडे हे शेअर्स वळते केले होते. माल्याच्या विरोधात मनी लाँड्रिंगअंतर्गत चौकशी करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयानं ते शेअर्स जप्त केले होते. काय आहे प्रकरण ?
- न्यायालयानं शेअर्सच्या विक्रीवर प्रतिबंध घालणारी याचिका फेटाळली होती.
- युनायडेट ब्रेवरेज होल्डिंग्सच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती म्हणाले होते की, शेअर्सच्या विक्रीवर प्रतिबंध आणता येणार नाहीत.
- प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट(पीएमएलए) न्यायालयानं 1 हजार कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकण्यास परवानगी दिली आहे.
- माल्याची जप्त केलेली संपत्ती विकण्याचं हे पहिलंच प्रकरण आहे.
- कर्जवसुली प्राधिकरणाच्या बंगळुरूच्या खंडपीठानं 11 मार्चला माल्याला शेअर विकण्यासंदर्भातील नोटीस बजावली होती. विजय माल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या 6203.35 कोटी रुपयांच्या कर्जाच्या वसुलीसाठी हे केलं जातंय.
- व्याज आणि दंड मिळून माल्यावर बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज आहे.
- माल्या 2016पासूनच भारतातून परागंदा झाला आहे.