शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच मी भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही; शरद पवारांचा प्रथमच मोठा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य - १२ नोव्हेंबर २०२४, नोकरी, व्यवसायात कामाची प्रशंसा होईल, मान-प्रतिष्ठा वाढेल
3
प्रचाराचा आज ‘मंगळ’वॉर; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, राहुल गांधींच्या दाेन सभा!
4
एसटीचा ‘प्रासंगिक करार’; ९ हजार बस दोन दिवस राहणार निवडणूक कर्तव्यावर!
5
माजी आमदार आडम यांच्या घरावर दगडफेक; सोलापुरात खळबळ
6
भरधाव वाहनाने दुचाकीला उडवले; भीषण अपघातात दाेघे जागीच ठार 
7
"सुन लो ओवैसी तिरंगा लहराएंगे पाकिस्तान पर" ; मालाडमधल्या सभेत फडणवीसांची घोषणाबाजी
8
दहिसरला १.४३ कोटींचे दोन किलो सोने जप्त
9
कल्याणच्या बसला  उत्तर प्रदेशात अपघात; ट्रकच्या धडकेत ३८ जखमी, ९ जण गंभीर!
10
तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसताहेत : सरसंघचालक; जागतिक शांतीसाठी जगाची आता भारतावर आशा!
11
अल-कायदाच्या टेरर फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश; NIA चे देशभरात अनेक ठिकाणी छापे
12
"माझं ग्रहमान ठीक नाही"; सुजय विखेंच्या विधानावर जयश्री थोरात म्हणाल्या, "तुमची रेसिपी चुकली"
13
“माझ्याकडून एकच गोष्ट झाली नाही अन् ती म्हणजे...”; कबुली देत राज ठाकरेंचे मोठे विधान
14
“सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
15
मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या 'एक हैं तो सेफ है' ला मविआचे जशास तसे प्रत्युत्तर; दिला "हम सब नेक है..." चा नारा
17
‘काँग्रेस अध्यक्ष फक्त नावाचेच हिंदू...’, खरगेंच्या 'त्या' वक्तव्यावर आचार्य प्रमोद कृष्णम संतापले
18
“बॅग तपासली म्हणून इश्यू करण्याची गरज नाही, पोलिसांचा तो अधिकार”: प्रकाश आंबेडकर
19
"महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे..."; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवार म्हणाले एक लाखांच्या लीडने येणार, युगेंद्र पवारांचा पलटवार

‘तोंडी’ तलाकसाठी न्यायालयीन लढाई

By admin | Published: April 19, 2016 3:26 AM

पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तीनदा तलाक म्हणण्याचा मुस्लिम पुरुषाचा अधिकार रद्द करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला प्रखरपणे विरोध करण्याचा

लखनौ : पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तीनदा तलाक म्हणण्याचा मुस्लिम पुरुषाचा अधिकार रद्द करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला प्रखरपणे विरोध करण्याचा आणि ‘तलाक’ला घटनाबाह्य ठरविण्याची मागणी करणाऱ्या शायरा बानो यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात प्रतिवादी बनण्याचा निर्णय अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने (एआयएमपीएलबी) घेतला आहे. बोर्डच्या या निर्णयामुळे देशात ८० च्या दशकातील शाहबानो प्रकरणासारखा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.१९८५ मध्ये इंदूर येथील पाच मुलांची आई असलेल्या शाहबानो या ६२ वर्षीय घटस्फोटित मुस्लिम महिलेने सर्वोच्च न्यायालयात पोटगीच्या अधिकाराची लढाई जिंकली होती. परंतु राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस सरकारने इस्लामिक कट्टरपंथीयांच्या दबावापुढे झुकत संसदेत मुस्लिम महिला (घटस्फोटावरील अधिकारापासून संरक्षण) कायदा १९८६ पारित केला होता. या कायद्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निष्प्रभ ठरला आणि घटस्फोटित मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार नाकारण्यात आला. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये केंद्र सरकार अथवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्याचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्णय एआयएमपीएलबीने घेतला आहे. (वृत्तसंस्था)