शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

समझोता खटल्यासाठी सीमेवर न्यायालय?

By admin | Published: December 24, 2016 1:33 AM

भारत व पाकिस्तानच्या सीमारेषा अनेक युद्धांच्या साक्षीदार आहेत. आता मात्र त्यातील एका सीमारेषेवर वेगळीच लढाई

नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानच्या सीमारेषा अनेक युद्धांच्या साक्षीदार आहेत. आता मात्र त्यातील एका सीमारेषेवर वेगळीच लढाई पाहायला मिळणार आहे. ही लढाई असणार आहे कायद्याची. समझोता एक्स्प्रेसमध्ये २00७ साली झालेल्या स्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) भारत-पाकिस्तान सीमारेषेवर तात्पुरते न्यायालय उभारण्याचा विचार करत आहे. यासाठी लवकरच केंद्रीय गृह मंत्रालयाकडे परवानगी मागण्यात येणार असल्याचे समजते.समझोता एक्स्प्रेस स्फोटाचे साक्षीदार असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची चौकशी करण्याचा एनआयएचा प्रयत्न आहे. त्यांना न्यायालयात येणे सोपे जावे, यासाठी हा विचार सुरू असल्याचे कळते. गृह मंत्रालयाने एनआयएला न्यायालय उभारण्याठी परवानगी दिली तर, एखाद्या घटनेच्या सुनावणीसाठी सीमारेषेवर प्रथमच न्यायालय निर्माण होईल. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या मुख्य न्यायाधीशांनी एनआयएच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. सर्व बाजूंचा विचार केल्यानंतर यासंबंधी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एनआयएचे महासंचालक जनरल शरद कुमार यांनी दिली. असे न्यायालय उभारण्यापूर्वी देशाच्या सुरक्षेचा विचार करणेही आवश्यक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)