निर्मोही आखाड्यातील वादावर न्यायालयाचा आज निर्णय
By admin | Published: August 27, 2015 12:20 AM
नाशिक : निमार्ेही अनी आखाड्याचे श्री महंत अयोध्यादास यांच्याविरोधात महंत नागा भगवानदास व ब्रिजमोहनदास गुरू लक्ष्मणदासजी यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे़ न्यायालयाने बजावलेल्या समन्सनुसार अयोध्यादास यांचे वकील हजर झाले व त्यांनी पुरावे सादर केले़ या प्रकरणावर न्यायालय गुरु वारी (दि.२७) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नाशिक : निमार्ेही अनी आखाड्याचे श्री महंत अयोध्यादास यांच्याविरोधात महंत नागा भगवानदास व ब्रिजमोहनदास गुरू लक्ष्मणदासजी यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे़ न्यायालयाने बजावलेल्या समन्सनुसार अयोध्यादास यांचे वकील हजर झाले व त्यांनी पुरावे सादर केले़ या प्रकरणावर न्यायालय गुरु वारी (दि.२७) सुनावणी होण्याची शक्यता आहे.महंत नागा भगवानदास व ब्रिजमोहनदास यांनी महंत अयोध्यादास यांच्याकडून केली जाणारी आखाड्यातील प्रवेशास बंदी व श्रीमहंताईबाबत प्रश्न उपस्थित करून सहावे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश ए. एच काशीकर यांच्या न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने महंत राजेंद्रदास, अयोध्यादास व परमात्मादास यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महंत अयोध्यादास व राजेंद्रदास हे न्यायालयात हजर झाले होते. त्यांनी लेखी स्वरूपात न्यायालयात आपले म्हणणे मांडले असून महंत नागा भगवानदास व ब्रिजमोहनदास यांच्याविरुद्ध पुरावे सादर केले आहे. त्यानुसार याप्रकरणी न्यायालयात गुरुवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)