बंगळुरू : म्हैसुर अर्बन डेव्हलपमेंट अॅथॉरिटीमध्ये (मुडा) पर्यायी जागावाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात खटला चालविण्यास राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी परवानगी दिली होती. त्याविरोधात मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात सोमवारी रिट याचिका दाखल केली.
त्यावर लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने २९ ऑगस्टपर्यंत सुनावणी पुढे ढकलावी, असा आदेश न्यायालयाने दिला. सिद्धरामय्या यांच्या रिट याचिकेबाबत कोणताही इतर आदेश देण्यात आलेला नाही. वैधानिक आदेशांचे उल्लंघन करून खटला चालविण्याची परवानगी दिली, असा दावा सिद्धरामय्या यांनी केला आहे.
राजकीय लढे देताना अधिक बळ प्राप्त होते' राजकीय लढे देताना मला अधिक बळ प्राप्त होते. माझा न्याययंत्रणेवर विश्वास आहे. मी काहीही चुकीचे केलेले नाही. न्यायालयाकडून मला नक्की दिलासा मिळेल, असे सिद्धरामय्या यांनी सोमवारी म्हटले.