ग्वाल्हेर - 'इंटरनेटच्या युगात मुले लवकर तरुण होत आहेत. त्यामुळे सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय १८ वरून १६ वर आणावे,' अशी विनंती ग्वाल्हेर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. बलात्कार प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने टिप्पणी केली.
एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोचिंग क्लास संचालक राहुल तीन वर्षांपासून तुरुंगात आहे. मुलीच्या संमतीने संबंध ठेवल्याचा पुरावा सादर करत त्याने त्याच्याविरुद्धचा बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्याच्यावर १७ वर्षीय विद्यार्थिनीने
तरुणांवर अन्याय....- कोर्टाने केंद्राला विनंती करताना म्हटले की, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या युगात १४ वर्षांची मुले तरुण होत आहेत. एकमेकाकडे आकर्षित होऊन ते संमतीने नाते निर्माण करतात.- अशा वेळी तरुण आरोपी अजिबात नसतात. आजकाल बहुतेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये, पीडितेचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे. या विसंगतीमुळे किशोरवयीन तरुणांवर अन्याय होत आहे.- बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात विद्यार्थिनी गरोदर राहिली होती. हायकोर्टाने सप्टेंबर २०२० मध्ये तिला गर्भपाताची परवानगी दिली होती.