शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
2
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!
3
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन
4
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
5
लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO)
6
Yahya Sinwar Death: याह्या सिनवारनंतर हमासची कमान कोण सांभाळणार? 'हे' टॉप ५ लीडर शर्यतीत...
7
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे
8
“शरद पवार ४ वेळा CM, केंद्रात-राज्यात एकच सत्ता, तरी राज्याचा विकास केला नाही”: उदयनराजे
9
"आई, मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जातेय"; कुटुंबीय वाट पाहत राहिले पण मुलगी घरी आलीच नाही
10
आप नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर; तब्बल 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर
11
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
12
Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर
13
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
14
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत
15
'वाळवा विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक'; सदाभाऊ खोतांनी उमेदवारीची केली मागणी
16
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
17
सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती
18
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
19
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
20
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?

महापालिकेवर साहित्य जप्तीची नामुष्की कंत्राटदाराची रक्कम अदा करण्याचे न्यायालयाचे आदेश

By admin | Published: September 29, 2014 9:47 PM

अकोला : बांधकाम विभागामार्फत विकास काम केलेल्या कंत्राटदाराचे देयक अदा न करणार्‍या मनपा प्रशासनाला स्थानिक न्यायालयाने चांगलाच झटका दिला. कंत्राटदाराची रक्कम अदा करा, अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. साहित्य जप्त करण्यासाठी मनपात दाखल झालेल्या न्यायालयाच्या कर्मचार्‍यांना अक्षरश: सायंकाळपर्यंत प्रशासनाने झुलवत ठेवले. अखेर सायंकाळी प्रशासनाने न्यायालयात दीड लाख रुपये जमा करून तात्पुरता स्थगनादेश मिळवल्याने साहित्य जप्तीची नामुष्की टळली.

अकोला : बांधकाम विभागामार्फत विकास काम केलेल्या कंत्राटदाराचे देयक अदा न करणार्‍या मनपा प्रशासनाला स्थानिक न्यायालयाने चांगलाच झटका दिला. कंत्राटदाराची रक्कम अदा करा, अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. साहित्य जप्त करण्यासाठी मनपात दाखल झालेल्या न्यायालयाच्या कर्मचार्‍यांना अक्षरश: सायंकाळपर्यंत प्रशासनाने झुलवत ठेवले. अखेर सायंकाळी प्रशासनाने न्यायालयात दीड लाख रुपये जमा करून तात्पुरता स्थगनादेश मिळवल्याने साहित्य जप्तीची नामुष्की टळली.
कंत्राटदार राजनारायण सिंग यांचे बांधकाम विभागामार्फत केलेल्या विकास कामाचे २००८ पासून ४ लाखाचे देयक थकीत आहे. मनपा देयक अदा करीत नसल्यामुळे सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली. वर्षाकाठी साडेबारा टक्के व्याजाची आकारणी करीत ६ लाख रुपये द्या अन्यथा मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी जारी केले. साहित्य जप्तीसाठी चक्क मेटॅडोर मनपात आणण्यात आला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. न्यायालयातील संबंधित कर्मचार्‍यांना प्रशासनाने सायंकाळपर्यंत ताटकळत ठेवले. मनपाच्या विधी अधिकार्‍यांनी तडक न्यायालयात एकूण रकमेच्या २५ टक्केप्रमाणे दीड लाख रुपये जमा करीत तात्पुरता स्थगनादेश मिळवल्याने जप्तीची कारवाई टळली.