शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

रागीट पत्नीला घटस्फोट देण्यास कोर्टाची परवानगी

By admin | Published: September 01, 2014 9:08 AM

कूमशाह आणि रागीट प्रवृत्तीसह वारंवार वासनेची इच्छा प्रकट करणार्‍या पत्नीच्या जाचातून सुटका व्हावी, म्हणून न्यायालयाचे दार ठोठावणार्‍या पतीला कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटास परवानगी दिली आहे.

मुंबई : हुकूमशाह आणि रागीट प्रवृत्तीसह वारंवार वासनेची इच्छा प्रकट करणार्‍या पत्नीच्या जाचातून सुटका व्हावी, म्हणून तिच्याविरोधात न्यायालयाचे दार ठोठावणार्‍या पतीला कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटास परवानगी दिली आहे.कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश लक्ष्मीराव यांनी या प्रकरणी आदेश दिले असून, ते या आदेशात म्हणतात की, संबंधित महिला या प्रकरणात न्यायालयात समक्ष हजर झाली नाही. या कारणात्सव याचिकाकर्त्या पतीची साक्ष गृहीत धरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि घटस्फोट मिळविणे हा त्याचाही अधिकार आहे.जानेवारी महिन्यात पतीने या प्रकरणी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. आपली पत्नी रागीट, जिद्दी, मनमानी आणि हुकूमशाही प्रवृत्तीची आहे. तसेच कोणतेही कारण नसताना ती वाद घालते, असे म्हणणे मांडले होते. दाखल केलेल्या याचिकेत असेही म्हटले होते की, वारंवार वासनेची इच्छा व्यक्त करणे हा तिचा स्वभाव बनला होता. शिवाय २0१२ साली विवाह झाल्यानंतर तिने माझा याबाबत छळ मांडला होता. शिवाय औषधांसह मद्य प्राशन करण्याबाबत त्याच्यावर ती जबरदस्ती करत होती, असाही आरोप पतीने केला होता.डिसेंबर २0१२ मध्ये पतीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते. याचवेळी ती बहिणीच्या घरी गेली. तेथून दोन आठवड्यांनी परत आली. दुसरीकडे डॉक्टरांनी पतीला काही दिवस शारीरिक संबंध ठेवू नकोस, असा सल्ला दिला होता. मात्र, पत्नी लैंगिक संबंधाची मागणी करतच राहिली. परिणामी पतीचे आरोग्य ढासळतच गेले. पतीने पत्नीला मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत, असा सल्लाही दिला. परंतु, तिने त्याला जुमानले नाही. ती त्याला धमक्या देतच राहिली. त्यानंतर मात्र त्याने आणखी अत्याचार सहन करू शकत नसल्याचे म्हटले. जिवाला धोका असल्याचे नमूद करून त्याने याचिका दाखल केली. न्यायाधीश राव यांनी याचिका दाखल करून घेत संबंधित व्यक्तीला घटस्फोटाचीही परवानगी दिली.

- वासनेची इच्छा प्रकट करतानाच ती त्याला अनैसर्गिक संबंधाबाबत जबरदस्ती करत होती. शिवाय तिला जुमानले नाही, तर ती त्याच्याशी गैरवर्तन करत होती. त्याला शिवीगाळ करत होती.

- त्यामुळे तिचे ऐकण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहत नव्हता. आणि जर त्याने तिची ती इच्छा पूर्ण केली नाही तर परपुरुषाकडे जाईन, अशा धमक्याही ती देत असल्याचा आरोप पतीने केला होता.

(प्रतिनिधी)