शहाजहानपूर : कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले भाजपचे नेते चिन्मयानंद यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. खंडणी मागितल्याची तक्रार चिन्मयानंद यांनी ज्यांच्याविरोधात दाखल केली त्या संजय, सचिन, विक्रम या तिघांनी जामिनासाठी केलेले अर्जही न्यायालयाने फेटाळून लावले.चिन्मयानंद यांनी जामीनासाठीचा अर्ज सत्र न्यायालयात करायला हवा असे सांगत शहाजहानपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी तो सोमवारी फेटाळून लावला. ही माहिती आरोपीचे वकील ओम सिंह यांनी मंगळवारी दिली. खंडणी मागण्यासाठी चिन्मयानंद यांना दूरध्वनी करण्यात आला तो मोबाईल फोन तीन खंडणीखोरांनी पुरावा नष्ट करण्यासाठी राजस्थानमधील मेहंदीपूर बालाजी येथे फेकून दिला होता. तिथे त्यांना नेऊन मोबाईलचा शोध घेण्याकरिता तीन आरोपींना ९५ तासांची कोठडी देण्यात यावी अशी विनंती एसआयटी पथकाने न्यायालयाला केली होती. चिन्मयानंद यांच्या वकीलांच्या मोबाईलवरही खंडणीसाठी धमकीवजा संदेश पाठविण्यात आला होता. हा मोबाईल ताब्यात घेऊन फोरेन्सिक तपासणीसाठी पोलिसांनी पाठविला आहे.भाजप नेते चिन्मयानंद यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाºया विद्यार्थीनीने अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज शहाजहानपूर न्यायालयाने दाखल करून घेतला आहे. याआधी तिने अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्याच्या दुसºया दिवशी पोलिसांनी तिला खंडणी मागण्याच्या एका प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चिन्मयानंद यांच्याकडे खंडणी मागण्याच्या या प्रकरणात तिच्या मित्रांना पोलिसांनी याआधीच अटक केली आहे. (वृत्तसंस्था)पाच ते दहा वर्षांचा कारावास होऊ शकतोभाजप नेते चिन्मयानंद यांच्या संस्थेतर्फे चालविण्यात येणाºया एका महाविद्यालयामध्ये कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. ते सुमारे वर्षभर या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करत होते.या गुन्ह्यासाठी चिन्मयानंद यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मात्र त्यांना हृदयरोगाशी संबंधित तपासण्यांसाठी सोमवारी लखनौ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.चिन्मयानंद यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३७६ क कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप सिद्ध झाल्यास त्यांना पाच ते १० वर्षांचा कारावास होऊ शकतो.
भाजप नेते चिन्मयानंद यांना न्यायालयाने जामीन नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 2:04 AM