भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने १५ एप्रिल २०२४ पर्यंत सीबीआयच्या कोठडीत आहेत. न्यायालयाने शुक्रवारी के. कविता यांना पाच दिवसांची कोठडी देण्याची विनंती करणाऱ्या सीबीआयच्या याचिकेवरील आदेश सायंकाळपर्यंत राखून ठेवण्यात आला होता.
'लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची? 'शरद पवारांच्या 'त्या' विधानावर अंजली दमानियांचा सवाल
दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सीबीआयने कविता यांना अटक केली आहे. सीबीआयने कविता यांना गुन्हेगारी कट आणि खात्यांमध्ये फेरफार आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या काही कलमांखाली ताब्यात घेतले होते. सीबीआयने कोर्टाकडे बीआरएस नेत्याच्या ५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
न्यायालयात सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की, आम आदमी पार्टीला १०० कोटी रुपयांची लाच देण्यात के कविता यांनी मोठी भूमिका बजावली. त्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आहेत. एका मोठ्या उद्योगपतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्पादन शुल्क धोरणाद्वारे पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणाशी संबंधित अनेक आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हॉटेल ताजमध्ये ही बैठक झाल्याचे वकिलांनी सांगितले.
सीबीआयने सांगितले की, के कविता यांनी हैदराबादमध्ये व्यावसायिकाची भेट घेतली होती. विजय नायर यांच्या त्या संपर्कात होत्या. बीआरएस नेत्याने व्यावसायिकाला १०० कोटी रुपयांच्या आगाऊ रकमेची व्यवस्था करण्यास सांगितले होते. या पैशाची व्यवस्था करण्यात कविता यांचा मोठा वाटा होता. गोवा निवडणुकीसाठी हवालाद्वारे पैसे गोळा करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
दिल्लीतील मद्य धोरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी के कविता यांनी शरतचंद्र रेड्डी यांना पुढे केले होते, असे तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले. अभिषेक बोईनपल्ली यांनी विजय नायर यांना १०० कोटी रुपये दिल्याचे सांगितले होते, याला सरकारी साक्षीदार दिनेश अरोरा यांनी पुष्टी दिली आहे. मद्य धोरणात आतापर्यंत दाखल झालेल्या आरोपपत्रातील मनीष सिसोदिया, विजय नायर आणि अन्य आरोपींच्या भूमिकेबाबतचे तथ्य सीबीआयने न्यायालयासमोर मांडले, त्या आधारे के कविता यांच्या कोठडीची मागणी करण्यात आली.