नवी दिल्ली : निष्कासित परिविक्षाधीन आयएएस पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने खाेटी साक्ष दिल्याप्रकरणी खुलासा मागितला आहे. अटकपूर्व जामिनासाठी दाखल याचिकेसंदर्भात म्हणणे मांडताना खेडकरने चुकीची माहिती देऊन खोटी साक्ष दिल्याचा आरोप यूपीएससीने केला आहे. यावर न्या. सुब्रह्मण्यम प्रसाद यांनी खुलासा करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणाची पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला होईल. यूपीएससीच्या वतीने ज्येष्ठ वकील नरेश कौशिक यांनी न्यायालयाला सांगितले की, खेडकरने अनुकूल निकालासाठी खोटी साक्ष दिली आहे. ओळख पटविण्यासाठी किंवा इतर कोणत्याही उद्देशाने खेडकरच्या बायोमेट्रिकचे (डोळे व बोटे) नमुने घेण्यात आलेले नाहीत. कोणत्याही उमेदवाराची बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही.
असे आहेत दावे-प्रतिदावे
nबायोमेट्रिक माहिती एकत्रित केल्याचा खेडकरचा आरोप खोटा. तिची ही वागणूक खोटी साक्ष दिल्यासारखीच आहे : यूपीएससी
nया प्रकरणात दबाव टाकण्यासाठी यूपीएससीने आखलेली ही एक रणनीती आहे : खेडकरच्या वकिलांचा दावा.
nदिल्ली पोलिस म्हणतात, जामीन नकोच... यामुळे तपासात बाधा निर्माण होऊ शकते.