नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यामध्ये भोजशाळा या ऐतिहासिक वास्तूचे एएसआयकडून शास्त्रीय सर्वेक्षण सुरू असून त्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर आमच्या परवानगीशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. भोजशाळेचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात यावे, या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ११ मार्च रोजी दिलेल्या आदेशाविरोधात मौलाना कमालुद्दीन वेल्फेअर सोसायटीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्या.हृषिकेश रॉय, न्या.पी.के. मिश्रा यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार, मध्य प्रदेश सरकार, एएसआय व अन्य संबंधित लोकांना नोटिसा जारी केल्या आहेत. शास्त्रीय सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर आमच्या आदेशाशिवाय कोणतीही कार्यवाही करायची नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
भोजशाळेच्या सर्वेक्षण स्थगितीस कोर्टाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 8:10 AM