नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन (Covaxin) लस डेल्टा व्हेरिएंटवर (Delta Variant) प्रभावी आहे, जो आतापर्यंत कोरोनाचा सर्वांत घातक व्हेरिएंट आहे. आयसीएमआरच्या अभ्यासात (ICMR Study) हे समोर आले आहे की, डेल्टाच्या तिन्ही म्यूटेशनवर कोव्हॅक्सिन लस 77 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. म्हणजेच, या अभ्यासानुसार, जर तुम्हाला कोव्हॅक्सिन लस मिळाली असेल, तर तुम्हाला डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण मिळू शकते.
डेल्टा व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिन किती प्रभावी?लसीकरण झालेल्या लोकांचा अभ्यास करण्यात आला. यावेळी डेल्टा संसर्ग (Delta Variant) झाल्यावर त्यांना किती संरक्षण मिळाले, हे पाहण्यात आले. डेल्टा व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिन किती काम करत आहे, हे जाणून घेण्यासाठी 25 हजार 798 लोकांवर अभ्यास करण्यात आला. ही लस कोरोनाबाधित लोकांमध्ये 63.6% प्रभावी असल्याचे आढळले आणि ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही, त्यांच्यामध्ये 65.2 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले.
एकूण रुग्णांपैकी 90 टक्के डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण भारतात सध्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण डेल्टा व्हेरिएंटमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, ब्रिटन आणि अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. डेल्टा व्हेरिएंट इतर तीन व्हेरिएंट ऑफ कंसर्नच्या (Alpha, Beta, Gama) तुलनेत अधिक वेगाने पसरत आहे आणि रुग्णासाठी देखील धोकादायक ठरत आहे.
लसीच्या दोन डोसनंतर सुरक्षाडेल्टाचे चार म्यूटेशन झाले आहेत. डेल्टा AY.1, AY.2 आणि AY.3. असे मानले जाते की, डेल्टा सर्वात आधी भारतात एप्रिल 2021 मध्ये आढळला. त्यानंतर तो इतर देशांमध्ये पसरला. आता डेल्टा युरोप, आशिया आणि अमेरिकेत कहर माजवत आहे. मात्र, या अभ्यासात असे आढळून आले की, लसीच्या दोन्ही डोस नंतर डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण मिळत आहे.
कोव्हॅक्सिनची चाचणी मुलांवर सुरूभारत बायोटेक आणि आयसीएमआर यांनी संयुक्तपणे कोव्हॅक्सिन लस विकसित केली आहे. आता या लसीची चाचणी मुलांवरही सुरू आहे. लवकरच सप्टेंबरपर्यंत ही लस मुलांवर चाचणी पूर्ण करू शकते.