नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, कोरोनावरील लसींचे परीक्षण जागतिक पातळीवर सुरू आहे. ब्रिटन, अमेरिका आणि रशियासह अनेक देशांतील कंपन्या कोरोनाविरोधात लस विकसित करून जगाला दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहेत. हैदराबादमधील भारत बायोटेकसुद्धा त्यापैकीच एक आहे. या कंपनीकडून कोव्हॅक्सिन विकसित करण्यात येत आहे. तसेच या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. दरम्यान, भारतात तयार झालेली कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाविरोधात ६० टक्के प्रभावी असल्याचा दावा ही लस निर्माण करत असलेल्या कंपनीचे अध्यक्ष साई डी. प्रसाद यांनी केला आहे.कोव्हॅक्सिन ही भारताची स्वदेशी कोरोना लस आहे. ही लस भारत बायोटेकने आयसीएमआर आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी यांच्या सहकार्याने विकसित केली आहे. भारत बायोटेकच्या दव्यानुसार कोविड-१९ विरोधात कोव्हॅक्सिन किमान ६० टक्के प्रभावी राहणार आहे, हा प्रभाव त्यापेक्षा अधिक असून शकतो.याबाबत भारत बायोटेकचे अध्यक्ष साई डी प्रसाद यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना सांगितले की, कोव्हॅक्सिन कोविड-१९ विषाणूविरोधात किमान ६० टक्के प्रभावी राहील. डब्ल्यूएचओ, अमेरिकेची एफडीए आणि भारताची केंद्रीय ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनसुद्धा जर कुठलीही रेस्पिरेटरी व्हॅक्सिन ५० टक्के प्रभाव दाखवत असेल तर तिला मंजुरू देता. आमचे लक्ष्य किमान ६० टक्के प्रभावी लस विकसित करण्याचे आहे, मात्र तिचा प्रभाव अधिकही असू शकतो, असे साई डी. प्रसाद यांनी सांगितले.ेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे कोव्हॅक्सिनच्या स्टोरेजसाठी २ ते ८ डिग्री तापमानाची आवश्यकता भासेल. सध्या भारत बायोटेककडे तीन कोटी डोस निर्माण करण्याची क्षमता आहे. ही क्षमता पुढच्या वर्षी वाढवून पन्नास कोटी करता येईल. मात्र कंपनीने लसीच्या किमतीची माहिती दिलेली नही. कोव्हॅक्सिनच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात भारतात २५ केंद्रांवर २६ हजार स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्यात आले आही. कुठल्याही लसीची भारतातील मोठी वैद्यकीय चाचणी आहे. एवढेच नाही लसीचा तिसऱ्या टप्प्यातील प्रभाव जाणून घेण्यासाठीचे पहिले संशोधन आहे.