भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) माहिती दिली आहे की, सध्या देशात पाच व्हायरस पसरले आहेत. ICMR ने देशभरात पसरलेल्या 30 हून अधिक केंद्रांवर संक्रमित रूग्णांच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर कोरोना व्हायरससह H1N1, H3N2 सारखे A टाइप इन्फ्लूएंझा आणि B टाइप इन्फ्लूएंझा म्हणजेच यामागाटा आणि व्हिक्टोरिया व्हायरसचा प्रसार झाल्याची पुष्टी केली आहे.
ICMR ने सांगितले की, देशातील 30 वेगवेगळ्या ठिकाणी सर्विलान्स नेटवर्क तयार केले आहे, जिथे रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे. येथे तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये 0.1 टक्के लोकांना दुय्यम संसर्ग म्हणजेच एकापेक्षा जास्त व्हायरसचा संसर्ग आढळून आला. 10 नमुन्यांमध्ये H3N2 तर 18 नमुन्यांमध्ये व्हिक्टोरिया व्हायरसची ओळख पटली आहे.
ICMR कडून सांगण्यात आले आहे की या सर्व व्हायरसची लक्षणे खूप सारखी आहेत. अशा स्थितीत तीन-चार दिवसांपेक्षा जास्त काळ कोणत्याही व्यक्तीला त्याची लक्षणे दिसल्यास त्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. इन्फ्लूएंझा संसर्गाची लवकर ओळख पटल्यास व्हायरस होण्यापासून रोखता येतो आणि रुग्णावर लवकर उपचार करता येतात.
व्हायरसच्या सामान्य लक्षणांमध्ये उच्च ताप, थंडी वाजून येणे, घसा खवखवणे, खोकला, सर्दी, थकवा आणि अंगदुखी यांचा समावेश होतो. इन्फ्लूएंझा व्हायरसने आता एंडेमिक स्वरूप धारण केले आहे, म्हणजेच तो नेहमी वातावरणात असतो. त्याचे पीक वर्षातून दोनदा पावसाळा आणि हिवाळ्यात दिसते. अशा परिस्थितीत त्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही. वेळेवर योग्य उपचार तुम्हाला त्रासांपासून दूर ठेवू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"