Covid-19, Corinavirus in India Latest Updates: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. परंतु आता देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिस आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ५८,४१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,९८,८१,९६५ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात रुग्ण बरे होण्याचा दरही आता वाढला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry of India) माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ५८,४१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. ८१ दिवसांनंतर देशात ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यादरम्यान ८७,६१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसंच १,५७६ रुग्णांच्या मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे. सध्या देशात ७ लाख २९ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
२७,६२ कोटींपेक्षा अधिक लोकांचं लसीकरणभारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत २७.६२ कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक (Corona Vaccine) लस देण्यात आली आहे. शनिवारी देशात ३३,७२,७४२ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात १८ ते ४४ या वयोगटातील २०,४९,१०१ नागरिकांना शनिवारी लसीचा पहिला डोस, तर ७८,३४९ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.