Coronavirus in India, Covid-19, Latest Updates: गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत होती. परंतु आता कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात २,८१,३८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ३,७८,७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.गेल्या चोवीस तासांत थोडी दिलासादायक बाब म्हणजे नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचं समोर आलं आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ३,७८,७४१ रुगांनी कोरोनावर मात केली. तर दुसरीकडे ४,१०६ रुगांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. तर दिल्ली आणि महाराष्ट्रातही रुग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
Coronavirus : कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:01 AM
Coronavirus Updates : गेल्या चोवीस तासांत तीन लाखांपेक्षाही कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, दिल्ली, महाराष्ट्रात रुग्णसंख्येत होतेय घट.
ठळक मुद्देगेल्या चोवीस तासांत तीन लाखांपेक्षाही कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, दिल्ली, महाराष्ट्रात रुग्णसंख्येत होतेय घट.