जयपूर: कोरोनाची लक्षणं आढळून आलेल्या एका वृद्ध व्यक्तीनं आत्महत्या केल्याची घटना राजस्थानात घडली आहे. प्रताप नगरमधील राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठात (आरयूएचएस) हा प्रकार घडला. वृद्धानं दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यानं त्याचा मृत्यू झाला. कैलाश चंद शर्मा (७८ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.कोरोनाची लक्षणं आढळून आल्यामुळे कैलाश चंद शर्मा यांना राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सेमी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल काल डॉक्टरांना मिळाला. तो निगेटिव्ह आला. मात्र त्याची माहिती शर्मा यांनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. त्यासाठी तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.'शर्मा यांनी आत्महत्या करण्याच्या अवघ्या पाच मिनिटांपूर्वी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आम्हाला मिळाला. तो निगेटिव्ह आला. मात्र त्याची माहिती देण्यापूर्वीच शर्मा यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं,' अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल जैन यांनी दिली. शर्मा यांना आधी शास्त्रीनगरमधील कनवटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर त्यांना आरयूएचएसमध्ये दाखल करण्यात आलं.
CoronaVirus News: कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीची दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 1:05 PM