देशात कोविड-19 चा प्रादुर्भाव सुरूच आहे. अजूनही रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापासून दिलासा देण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि उपचाराची गरज असेल तर तो सरकारी मदत घेऊ शकतो. ही मदत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कर्मचाऱ्यांना देत आहे. उपचाराच्या खर्चासाठी EPFO कडून आगाऊ स्वरूपात आर्थिक मदत घेतली जाऊ शकते. सरकारने कोविड-19 ला देशव्यापी महामारी घोषीत केल्यामुळे, देशभरातील कंपन्या आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या EPF योजनेच्या सदस्यांना आगाऊ रक्कम मिळण्याचा अधिकार आहे.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही आगाऊ रक्कम घेण्यासाठी ईपीएफ सदस्य किंवा त्याच्या कंपनीला कोणतेही प्रमाणपत्र किंवा कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. या अंतर्गत, तुम्ही तीन महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता किंवा EPF खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 75%, यापैकी जे कमी असेल ते परत करण्यायोग्य काढू शकता.
किती पैसे मिळवू शकता?EPF मधून किती पैसे घेता येतील? हे एका उदाहरणाने समजून घ्या. जर आज सदस्याच्या EPF खात्यात 50,000 रुपये जमा आहेत आणि सदस्याचे मासिक मूळ वेतन व महागाई भत्ता 15,000 रुपये असेल, तर 50,000 रुपयांच्या शिल्लक रकमेच्या 75 टक्के रक्कम 37,500 रुपये इतकी होते. यानंतर तीन महिन्यांच्या पगाराची रक्कम ४५ हजार रुपये झाली. अशाप्रकारे 37,500 रुपये जे दोन्ही रकमेपेक्षा कमी आहेत, मग 37,500 रुपये सभासदाला आगाऊ रक्कम म्हणून काढता येऊ शकते. ही रक्कम कोरोनाच्या उपचारात वापरली जाऊ शकते.
आता आगाऊ रक्कम घेण्यासाठी ऑनलाइन दावा कुठे आणि कसा दाखल करता येईल ते जाणून घेऊयात. यासाठी तुम्हाला www.epfindia.gov.in वेबसाइटच्या होमपेजवर Covid-19 टॅब अंतर्गत सूचना देण्यात आल्या आहेत. या विभागात जाऊन तुम्ही आगाऊ अर्ज करू शकता. त्याची प्रक्रिया जाणून घेऊयात...
१. युनिफाइड पोर्टलच्या सदस्य इंटरफेसवर लॉग इन कराhttps://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface
२. ऑनलाइन सेवेवर क्लिक करा, दावा (फॉर्म 31,19,10C आणि 10D पाहा)
३. तुमच्या बँक खात्याचे शेवटचे ४ अंक प्रविष्ट करा आणि पडताळणी करा.
४. Processed for Online Claim वर क्लिक करा
५. ड्रॉप डाउनमध्ये पीएफ अॅडव्हान्स निवडा (फॉर्म 31)
६. ड्रॉपडाऊनमधून purpose म्हणून Outbreak of pandemic (Covid-19) निवडा
७. आवश्यक रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि तुमचा पत्ता प्रविष्ट करा.
८. Get Aadhaar वर क्लिक करा
९. आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका
१०. तुमचा दावा नोंदवला जाईल.