नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हातात काम नसल्याने अनेकांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. अशीच एक घटना पानीपतमध्ये घडली आहे. नोकरी गेल्याने एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका महिन्यापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. य घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पानीपतमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहित दाम्पत्याने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आवेद (28) आणि त्याची पत्नी नजमा (19) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. आवेदचा मोठा भाऊ जावेदने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑगस्ट रोजी या दोघांचं लग्न झालं होतं. आपल्या आवडत्या मुलीबरोबर लग्न झाल्याने आवेद आनंदात होता. एका खासगी कंपनीमध्ये तो वेल्डर म्हणून काम करायचा. मात्र कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये त्याची नोकरी गेली.
घरामध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या
नोकरी गेल्यानंतर अनलॉक पुन्हा काही तरी काम मिळेल अशी त्याला आवेदला आशा होती. पण तसं झालं नाही. नवीन नोकरी मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावामध्ये होता. आवेदला त्याचा मित्र नफीस भेटायला आला होता. त्यावेळी नफीसने त्याला नोकरी शोध असा सल्ला त्याला दिला. त्यानंतर या दोघांनी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. जावेदची पत्नी चांदणीने सर्वप्रथम या दोघांचा मृतदेह पाहिला. त्यानंतर पोलिसाना याबाबत माहिती देण्यात आली.
नोकरी मिळत नसल्याने आवेद होता निराश
आवेदचे वडील अनवर खान हे सूत कातण्याच्या कारखान्यामध्ये काम करतात. तर जावेद स्वत: एका दुकानामध्ये कॅशियर म्हणून कामाला आहे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कधीही आवेदवर नोकरी करण्यासाठी दबाव टाकला नाही. मात्र नोकरी मिळत नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून निराश होता अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात
मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर
तरुणीचा पाठलाग करणं भाजपा नेत्याला पडलं महागात, नातेवाईकांनी धू-धू धुतलं, Video व्हायरल
CoronaVirus News : देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक, पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारी
भारीच! मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत अभियाना'मुळे बदललं तरुणाचं नशीब, महिन्याला लाखोंची कमाई