नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
दिल्लीत कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम युद्धपातळीवर केली जात आहे. दरम्यान, 'आम्ही दररोज सव्वा लाख लसीचे डोस नागरिकांना देत आहेत. तसेच, आम्ही लवकरच 3 लाखांहून अधिक लोकांना लस देण्यास सुरूवात करणार आहे', असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. याशिवाय, येत्या तीन महिन्यांत सर्व दिल्लीकरांना लस देण्याचे आमचे लक्ष्य आहे. परंतु लसींचा पुरवठा कमी असल्याची समस्या आहे, असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. (covid-19 vaccination announcement of cm kejriwal, all delhiites are to be vaccinated in 3 months)
दिल्ली सरकारच्या ज्या शाळांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे, तेथील लोक आनंदी आहेत. दिल्लीत आता काही दिवसांपूर्वता लसींचा साठा शिल्लक आहे. लसींबाबत समस्या देशव्यापी आहे, संपूर्ण देशात लसींची कमतरता आहे. काही राज्यात लसीकरणाचे कामदेखील सुरू झाले नाही, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. याशिवाय, सध्या दोन कंपन्या लसींचे उत्पादन करत आहे. लस उत्पादन युद्धपातळीवर केले पाहिजे. अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाला लस लागू करण्याची राष्ट्रीय योजना तयार केली पाहिजे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
'माझी एक सूचना आहे. फक्त दोन कंपन्यांनी लस बनवू नये, तर इतरही कंपन्यांनी लस तयार करावी. केंद्र सरकारने ज्या कंपन्या सुरक्षित पद्धतीने लस बनवू शकतात त्यांना फॉर्म्युला द्यावा. हे सुनिश्चित केले पाहिजे की सक्षम असलेल्या प्लांटमध्ये लस तयार केली पाहिजे', असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
(Corona Vaccine: खासगी रुग्णालयांमध्ये सर्वात महाग मिळतेय कोरोनाची लस, जाणून घ्या किंमत...)
याचबरोबर, पहिल्या कोरोना लाटेत पीपीई किटांची कमतरता होती. पण आता आम्ही बनवत आहोत, आपल्याकडे सर्वात मोठ्या फार्मा कंपन्या आहेत, सर्वोत्तम वैज्ञानिक आहेत. आपण लस बनवू शकतो. ज्या कंपन्यांनी मूळ फॉर्म्युला बनविला आहे त्यांना रॉयल्टी म्हणून काही भाग देता येईल, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.
(धक्कादायक! कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अवघ्या काही तासांत डॉक्टरचा मृत्यू!)
दिल्लीत कोरोनाची स्थिती गंभीरराजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन एक आठवडा वाढविण्यात आले आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार असून यामध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. दिल्लीत गेल्या काही दिवसांत १३ हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर २७३ जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत सध्या जवळपास ८६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.