भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना उपचारांसाठी चिरायू रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान, रुग्णालयात शिवराजसिंह चौहान आपले कपडे स्वतः धुवत आहे. कपडे धुण्याचा मोठा फायदा होत असल्याचेही ते म्हणाले.
मंगळवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या दरम्यान शिवराजसिंह चौहान म्हणाले, "कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मी स्वत: माझे कपडे धूत आहे. त्याचा मला खूप फायदा झाला. फिजिओथेरपी सेशननंतर सुद्धा मी माझ्या हाताची मुठी बांधू शकत नव्हतो, कारण नुकतेच माझे ऑपरेशन झाले. पण आता ते पूर्णपणे ठीक आहे."
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी ट्विट करुन आपल्या कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. मी कोरोना चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी क्वारंटाईन झालेलो आहे, असे त्यांनी ट्टिट केले होते. तसेच, माझ्या संपर्कात आलेल्यांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.
याशिवाय,"मी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्ण पालन करीत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वत: ला क्वारंटाइन राहीन आणि उपचार करून घेईन. राज्यातील जनतेने काळजी घ्यावी. थोडाशी निष्काळजीच कोरोनाला आमंत्रण देते," असेही शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट केले होते.
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 47,704 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 14 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 654 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 14,83,157 वर गेला आहे. तर आतापर्यंत देशभरात 33,425 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 64.23% टक्के झाले आहे. देशातील 9 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. 9,52,744 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 4,96,988 लोकांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे जगभरात तब्बल एक कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 10,231,837 जणांनी कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकले आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 16,643,498 वर गेली असून 656,621 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आणखी बातम्या...
राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका
कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरचा 'देसी जुगाड'; रुग्णांवर असा केला जातोय उपचार
अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा
राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित
पब्जीसह २७५ चिनी अॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत
'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!